दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’, ग्राहकांना जास्त भूर्दंड नाही! जाणून घ्या, दूध संघाचा निर्णय…

milk-delivery

पुणे : महिन्याभरात दुधाच्या दरात सलग दोनवेळा वाढ झाली आहे. दुधाच्या दरात वाढ करतांना एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा देतांना ग्राहकांना त्याचा फटका बसू नये याची काळजीही दूध उत्पादक संघाने घेतली आहे. दूध उत्पादक संघाच्या नव्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना लिटरमागे ३ रुपये अधिकचे मिळणार आहेत तर या बदल्यात ग्राहकांकडून केवळ २ रुपये अधिकचे आकारले जाणार आहेत.

दरवाढ मागची कारणे

दूध पावडर आणि लोणी याचे दर वाढले असल्याने दुधाच्या मागणीही वाढत आहे. दुसरीकडे इंधनाचे आणि पशूखाद्याचे दर देखील वाढलेले आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादनात घट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहकारी आणि खासगी अशा ४५ दुग्ध प्रकल्पांच्या उपस्थितीमध्ये दूध दर वाढीचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी ही त्वरीत केली जाणार आहे.

दुधाच्या दरात वाढ करुन केवळ शेतकर्‍यांना दिलासा आणि ग्राहकांना त्याचा फटका बसू नये याचा विचारही दूध उत्पादक संघाने घेतलेला आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांनी लिटरमागे ३ रुपये अधिकचे मिळणार आहेत तर या बदल्यात ग्राहकांना केवळ २ रुपये अधिकचे आकारले जाणार आहेत. आतापर्यंत ग्राहकांना गायीचे दूध हे ४८ रुपये लिटर प्रमाणे घ्यावे लागत होते ते ५० रुपयांनी घ्यावे लागणार तर दूध उत्पादकांचे ३० रुपये लिटरचे दूध संघाकडून ३३ रुपये लिटर प्रमाणे घेतले जाणार आहे.

Exit mobile version