‘या’ मासळीचे संगोपन करून होईल लाखोंचा नफा, जाणून घ्या सविस्तर

fish

नगर : मत्स्यपालनाच्या माध्यमातून मोठी कमाई होवू शकते, हे आता शेतकर्‍यांना कळून चुकले आहे. यामुळे अनेक शेतकरी, तरुण व नवीन प्रयोग करणारे मत्स्यपालनाकडे वळतांना दिसत आहेत. हा नफा देणारा उद्योग असला तरी कोणत्या प्रकारच्या माशांची निवड करायची, हे सर्वात महत्त्वाचे असते. आज आपण चितळ मासळी संगोपनाची माहिती जाणून घेणार आहोत. कारण हा मासा दुर्मिळ प्रजातीचा असल्याने त्याला बाजारात खूप मागणी आहे. यामुळे चितळ मासा कमी कालावधीत मोठा नफा कमवून देतो.

चितळ मासा हा अमेरिका आणि बांगलादेशात आढळणारा मासा आहे. हा तलावात जमिनीच्या तळाशी राहतो, म्हणून त्याला गोड्या पाण्यातील मासा असेही म्हणतात. हा मासा अतिशय खास आहे, कारण त्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. हे लहान मासे जसे की कोळंबी, गोगलगाय इत्यादी खातात. या माशाची योग्य काळजी घेतल्यास ते एका वर्षात सुमारे २ ते २.५ किलो होते, अशा प्रकारे एक एकर तलावातून १००० ते २००० किलो उत्पादन घेता येते.

चितळ माशांच्या संगोपनासाठी शक्य असल्यास त्यासाठी १ एकर शेतात तलाव तयार करण्याचा सल्ला दिला जातो. तलाव योग्य प्रकारे करण्यासाठी सर्वप्रथम तलावाचे योग्य उत्खनन करणे आवश्यक आहे. यानंतर तलाव खोदून काही दिवस असेच सोडावे लागते जेणेकरून जमिनीत भेगा पडतात. भेगा पडल्यानंतर ४०० किलो जनावरांचे शेण किंवा कोंबडी खत आणि ५० किलो चुना टाकावा. चितळ मासे तलावाच्या अगदी तळाशी राहतात, त्यामुळे तलावातील पाण्याचे प्रमाण ३ फुटांपेक्षा कमी आणि ४ फुटांपेक्षा जास्त नसावे. हे मासे मांसाहारी आहेत, त्यामुळे ३ ते ५ हजार तिलापिया मत्स्यबीज २ महिन्यांपूर्वी तलावात टाकावेत जेणेकरून काही दिवसांनी त्यांचा चितळ माशांना खाद्य म्हणून उपयोग करता येईल.

Exit mobile version