शेतकर्‍यांना अच्छे दिन : सलग तिसर्‍या वर्षी एमएसपीत वाढ; वाचा सविस्तर

msp

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सलग तिसर्‍या वर्षी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. तिळाच्या एमएसपीमध्ये ५२३ रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तांदळाची एमएसपी गेल्या वर्षीच्या १,९४० रुपये प्रति क्विंटलवरून २,०४० रुपये प्रति क्विंटल म्हणजेच १०० रुपये वाढवण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत चांगल्या पावसाने खरीप अन्नधान्य उत्पादनात सरासरी २.८ टक्के वाढ केली.

यंदा केंद्र सरकारने तेलबियांवर अधिक भर दिला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अन्न-धान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला असला तरी खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांना प्रोत्साहित करुन तेलबियांचे क्षेत्र वाढवण्याचा निर्धार सरकारचा आहे. या नव्या दरवाढीमुळे तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली तर जे खाद्यतेल सरकारला आयात करावे लागणार आहे त्यामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या एमएसपीमध्ये ८.८ टक्के तर सुर्यफूलाच्या आधारभूत किंमतीमध्ये ६.४ टक्के अशी वाढ करण्यात आली आहे.

सरकारने ज्या पिकांच्या आधारभूत किंमती वाढवल्या आहेत त्यामध्ये तेलबियांचा तर समावेश आहेच पण हवामानावर आधारित असलेले अन्नधान्य यामध्ये ज्वारी आणि मूग डाळीचा समावेश आहे. तर दुसरीकडे धान पिकाचा हमीभाव हा प्रति क्विंटल २ हजार ४० रुपये करण्यात आला आहे.

तिळाच्या खरेदी दरात ५२३ रुपयांची वाढ
मूगडाळ-४८० रुपये खरेदी वाढ
सूर्यफूलमध्ये-३५८ रु वाढ
भुईमूग-३०० रुपये वाढ

Exit mobile version