कृषी क्षेत्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल 62000 रुपये पगार मिळेल

nabard recruitment

nabard recruitment 2022 : नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटनं (नाबार्ड) १७० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. १८ जुलै २०२२ पासून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागांचा तपशील
या भरतीअंतर्गत ग्रामीण विकास बँकिंग सेवेतील सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी – A ची १६१ पदं, राजभाषा सेवेतील ७ पदं आणि प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेतील २ पदांचा समावेश करण्यात आला आहे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणं आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार, प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवेतील ग्रेड – पदांसाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय २५ ते ४० वर्षे दरम्यान असावं. तसेच, इतर पदांसाठी उमेदवाराचे वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.

निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत, उमेदवारांची प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे ग्रेड – A च्या पदांवर भरतीसाठी निवड केली जाईल. या प्राथमिक परीक्षेत २०० गुणांचे २०० प्रश्न विचारले जातील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला १२० मिनिटं मिळतील.

Exit mobile version