सुक्ष्म सिंचन संचासाठी अनुदान हवेय मग हे वाचाच

Irrigation area

जळगाव : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक सन 2022-23 अंतर्गत सुक्ष्म सिंचन संचाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील रु. 1.50 लक्ष मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पूरक अनुदानासाठी लाभ घेण्यासाठी सुक्ष्म सिंचन संचाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी www.mahabtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी केले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, देय अनुदान टक्के – अल्प,अत्यल्प भूधारक -55 टक्के बहु भूधारक – 45 टक्के, योजनेचे नाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना , देय पूरक अनुदान – 35 टक्के, 45 टक्के, एकूण देय अनुदान -90 टक्के, अटी व शर्ती – लाभार्थी अनु. जाती ,जमाती प्रगर्वाचा असावा, अनु. जाती करिता वार्षिक उत्पन्न मर्या 1.50 लक्षपर्यंत असावी.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, देय अनुदान टक्के – अल्प,अत्यल्प भूधारक -55 टक्के बहु भूधारक – 45 टक्के, योजनेचे नाव – मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, देय पूरक अनुदान – 25 टक्के, 30 टक्के, एकूण देय अनुदान -80 टक्के, 75 टक्के अटी व शर्ती – लाभार्थी अनु. जाती, प्रवर्गाच्या लाभार्थ्यांकरिता वार्षिक उत्पन्न मर्या 1.50 लक्ष पेक्षा जास्त असावी, इतर प्रवर्गाकरिता उत्पन्न मर्यादा नाही.

योजनेचे नाव – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, देय अनुदान टक्के – अल्प,अत्यल्प भूधारक -55 टक्के बहु भूधारक – 45 टक्के, योजनेचे नाव – अटल भूजल योजना, देय पुरक अनुदान – 25 टक्के, 30 टक्के, एकूण देय अनुदान -80 टक्के, 75 टक्के अटी व शर्ती – लाभार्थी अटल भूजल योजनेंतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावातील असावा, असे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी कळविले आहे.

Exit mobile version