पोळ्याला बैलांना चक्क देशी दारुचा नैवेद्य; वाचा सविस्तर

Bullocks were fed country liquor

बीड : बैलपोळा हा दिवस बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मानला जातो. या दिवशी बैलांना शेतात राबवलं जात नाही. बैलांना सजवलं जातं. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांची पूजा केली जाते. राज्यात विविध ठिकाणी आता बैलपोळाचा उत्साह दिसून येत आहे. मात्र राज्यात केवळ बीडमधील एका शेतकर्‍याने साजरा केलेल्या बैलपोळ्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील देविनिमगाव येथील शेतकरी महादेव बाबूराव पोकळे यांनी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करताना त्यांच्या बैलांना चक्क देशी दारुचा नैवैद्य दाखविला. यावेळी बैलांना आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. शेतकर्‍याने देशी दारुच्या बाटलीचे बुच उघडून थेट बैलांच्या तोंडाला बाटली लावून दारु पाजली. या प्रकाराचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

गत दोन वर्षांपासून बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट होते. यामुळे दोन वर्षांपासून हा सण उत्साहात साजराच झाला नव्हता. मात्र आज राज्यातील गांवागावांमध्ये बैलपोळ्याचा उत्साह दिसून आला. पोळ्याच्या बाजारपेठेतही यंदा मोठी उलाढाल झाल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

Exit mobile version