१०० दिवस राज्यातील मंत्री शेतकर्‍यांसोबत राहणार; जाणून घ्या ‘एक दिवस शेतकर्‍यांसोबत’ अभियान

farmer

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने माझा एक दिवस शेतकर्‍यांसोबत या अभिनव उपक्रमाअंतर्गत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे राज्यभर दौरा करणार आहेत. एक दिवस शेतकर्‍यांसोबत राहून त्याच्या समस्या जाणून घेणार आहेत. तर आत्महत्येचे नेमके कारण काय याचाही आढावा घेतला जाणार आहे. १०० दिवस हा अनोखा उपक्रम असून यामध्ये शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

राज्य सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी आत्महत्या हा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचे सांगितले होते. ही घोषणा कृतीमध्ये उतरविण्यासाठी शिंदे सरकारचे मंत्री मैदानाच उतरणार आहेत. ‘एक दिवस शेतकर्‍यांसोबत’ अभियानअंतर्गत राज्य सरकार १०० दिवसांच्या उपक्रमात शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

यामध्ये लहानात-लहान बाबदेखील शेतकर्‍यांना शेअर करता येणार. राज्याचे कृषिमंत्रीच या प्रवासात असल्याने स्थानिक पातळीवर शेतकर्‍यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागतेय याचा अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळेच मत्री थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहेत. यामुळे अधिकारी स्थानिक पातळीवर नेमके काय काम करतात याचा आढावाही घेतला जाणार आहे.

Exit mobile version