शेतकर्‍यांनी साकारला कांद्याचा गणपती; कारण वाचून येईल तुमच्याही डोळ्यात पाणी

ganpati from onion

नाशिक : महाराष्ट्रात कांदा सातत्याने शेतकर्‍यांसा रडवत आहे. काही महिन्यांपूर्वी तर कापसाचे दर २ ते ३ रुपये प्रति किलोपर्यंत घसरले होते. कांद्याच्या दरात सातत्याने होणार्‍या घसरणीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी शेतकर्‍यांनी आंदोलने करत निषेध व्यक्त केला. मात्र अजूनही कांद्याच्या दराची घसरण थांबलेली नाही. यापार्श्‍वभूमीवर नाशिक व वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कांद्यापासून गणेशमूर्ती बनवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी सरकारला बुध्दी देण्याचे साकडेही गणरायाला घातले आहे.

नाशिकच्या नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांद्यापासून गणरायाची भव्य मुर्ती साकारली आहे. कांद्याला भाव कमी असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च निघत नाही. शेती व्यवसायात तोटा होतो. कोरोनामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे प्रत्येक शेतकर्‍याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण हा प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी वाशिम जिल्ह्यातील कामरगावच्या जय भवानी गणेश मंडळाने ६० किलो कांद्याचे पीक घेऊन गणेशजींच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

Exit mobile version