‘या’ ठिकाणी मिळतोय कांद्याला विक्रमी भाव

onion

नाशिक : बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होताच कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने विक्री होणार कांदा चक्क ३ ते ४ रुपये प्रति किलो दराने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. त्या तुलनेत उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये कांद्याला १२०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. केरळमध्ये तर कांद्याला ४५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय.

देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रात यंदा कांद्याचं उत्पादन चांगलं झालंय. पण अपेक्षित दरा कांद्याला मिळू शकलेला नाही. ४ ते ५ रुपये किलोने कांद्याची विक्री होतेय. त्यामुळे कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश बाजारात कांद्याचे दर घटलेत. नगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये १५ मे रोजी कांद्याला किमान १५० रुपये दर मिळाला होता. तर पुण्यातील जुन्नरमध्ये ३०० रुपये किमान दर प्रति क्विंटर दर मिळाला. त्यातुलनेत बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील ठाकुरगंज बाजारत १५ मे रोजी किमान १८५० रुपये प्रति क्विंटर दल मिळाला होता. तर २१०० ते २००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमाल दर तिथल्या शेतकर्‍यांच्या कांद्याला मिळाला.

Exit mobile version