या प्रश्‍नावरून शेतकरी संघटना रस्त्यावर

Success farmer

नाशिक : कांद्याच्या दरातील चढउतार हा शेतकर्‍यांसाठी नेहमीच डोकंदूखी ठरत असतो. आता कांद्याचे दर कमालीचे घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. यास कांद्याच्या निर्याय धोरणाची धरसोड कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. याविरोधात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. ‘कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह’ आंदोलनाची हाक देत हटके स्टाईल आंदोलन केले आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कांद्याच्या माळा बनवून गळ्यात घालून प्रतिकात्मक तिरडी खांद्यावर घेतली होती.

सातत्याने कांद्याच्या भावात घसरण आणि मुसळधार पावसाने झालेले नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडला असून मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. याच विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने कांदा प्रश्नावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव जवळील टेहरे हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह आंदोलन करण्यात आले आहे.

सरकारच्या नाफेड ला देखील फटका
कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेड कडून खरेदी करत कांदा साठवून ठेवला जातो. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीने किमंत स्थिरीकरण निधी अंतर्गत ही खरेदी केली जाते. यंदा अडीच लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. कांद्याचे बाजार भाव दहा ते बारा रुपये सरासरी दरावरच स्थिर राहिल्याने पाच महिन्यापूर्वी खरेदी केलेला कांदा हा आता वातावरणातील बदलामुळे खराब होत आहे. नाफेडच्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे यातील २ हजार मॅट्रिक टन कांदा हा गोडाऊन मधून काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील विविध भागांमध्ये १५ दिवसात पाठवण्यात आला आहे. हा कांदा काढताना यात मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याचे आढळून आले आहे.

Exit mobile version