सेंंद्रीय भाजीपाला पिकवणार्‍या अ‍ॅग्रो स्टार्टअपने मिळवली ५ दशलक्ष डॉलर्सची फंडिंग

healthy vegetables

पुणे : सेंद्रीय शेती, झिरो बजेट शेती किंवा रसायनमुक्त शेती या विषयाकडे आता गांभीर्याने पाहिले जावू लागले आहे. केवळ प्रगतीशिल शेतकरीच नव्हे तर अनेक अ‍ॅग्रो स्टार्टअप्सला याचे महत्व पटले आहे. असेच एक अ‍ॅग्रो स्टार्टअप म्हणजे, न्यूट्रिफ्रेश… संकेत मेहता आणि गणेश निकम या दोन तरुणांनी सुरु केलेल्या अ‍ॅग्रो स्टार्टअपने नुकतिच प्री-सीरीज सीड फंडिंग म्हणून ५ दशलक्ष डॉलर्सची फंडिंग मिळवली आहे.

न्यूट्रिफ्रेश गुणवत्तापूर्ण अन्न सुरक्षा आणण्यावर लक्ष केंद्रित करते. न्यूट्रीफ्रेशमध्ये संरक्षित लागवडीखाली भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासाठी अमेरिका व इस्त्रायलमध्ये वापरले जाणारे उच्च गुणवत्तेचे बियाणे वापरले जातात. शिवाय झाडांना आरओचे शुध्द पाणी व हवा देखील नियंत्रित करुन पुरवली जाते. कापणी/तोडणीनंतर २४ तासांत उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते.

न्यूट्रीफ्रेश मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये जवळपास १५,००० घरांना सेंद्रीय पालेभाज्यांची थेट विक्री करत आहे. यासह न्यूट्रीफे्रश १०० पेक्षा जास्त बीटूबी व्यावसायिकांना आपली उत्पादने पुरवत आहे. यामध्ये स्वीगी, झोमॅटो, नेचर्स बास्केट, बिग बास्केट, किसान कनेक्ट यासारख्या मोठ्या बॅ्रण्ड्सचा समावेश आहे. मिळालेल्या फंडिंगचा उपयोग शेतातील ऑपरेशन्स वाढवण्यासाठी, उत्पादनाची संपूर्ण शोधक्षमता आणि पारदर्शकता, मार्गेटिंग आणि एकात्मिक फार्म-टेक प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यासाठी केला जाणार आहे.

Exit mobile version