गोगलगायी, यलो मोझॅक सारख्या कीड रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे

kidrog

मुंबई : गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणार्‍या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडीमुळे होणार्‍या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकर्‍यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला सूचना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version