काय सांगता, पावने दोन एकरामध्ये तब्बल २२ लाखांचे उत्पन्न!

Papaya

पंढरपूर : कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी बाजारपेठेतील परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. हे दृष्टचक्र गत तीन-चार वर्षांपासून सुरु आहे. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मात्र अशा समयी माळशिरस तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकर्‍याने पावने दोन एकरामध्ये तब्बल २२ लाखाचे उत्पन्न घेण्याची किमया करुन दाखविली आहे.

दुष्काळी पट्ट्यातील तालुका असलेल्या माळशिरस येथील कन्हेर गावातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी केवळ पावने दोन एकरामध्ये पपईच्या २१०० रोपांची लागवड केली होती. त्यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे ८० ते ९० फळ लागले आहे. आठ महिने अथक परीश्रम आणि योग्य नियोजन करुन सरगर बंधू यांना तब्बल २२ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.

उत्पादनात घट आणि मागणी अधिक यामुळे पपईला अधिकचा दर मिळाला आहे. चेन्नई आणि कोलकत्ता येथून सरगर यांच्या पपईला मागणी आहे.
रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूने केलेली किमया सध्या इतर शेतकर्‍यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हा प्रयोग सेंद्रिय शेतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Exit mobile version