शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; ‘ई-केवायसी’ करीता पुन्हा मुदतवाढ

super app farmer

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १२ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना ‘ई-केवायसी’ हे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता ३० जून २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, शेतकर्‍यांचा सहभाग वाढावा म्हणून या मुदतीमध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत बँक खात्याचे ई केवायसी करता येणार आहे. १२ हप्ता हा सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यंत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशी पूर्ण करा ई-केवायसी प्रक्रिया
आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्‍लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे
आधारकार्ड वापरून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम फार्मर कॉर्नर वर ई-केवायसीला क्‍लिक करावे.

त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे व अंक जशी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ती तशीच्या तशी टाकावी त्यानंतर सर्च या पर्यायावर क्‍लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे. त्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर क्‍लिक करावे. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी नंबर येईल तो ओटीपी येथे सबमिट करावा. त्यानंतर सबमिट फॉर ऑथंटिफिकेशनवर क्‍लिक करावे. त्यानंतर ई-केवायसी सक्सेसफुली सबमिटेड असा एसएमएस येईल.

Exit mobile version