पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना न्यू ईअर गिफ्ट; थेट खात्यात पाठविले पैसे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍ऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्ताची रक्कम जमा केली आहे.त्यांतर्गत केंद्र सरकारने १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून प्रत्येकी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. यामध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पीएम किसान पोर्टलनुसार या स्कीमचा पहिला हप्ता १ डिसेंबरपासून ३१ मार्चदरम्यान पाठवला जातो. तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. तर तिसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो. यामुळे शेतकर्‍यांना दहाव्या हप्त्याची प्रतिक्षा होती. पंतप्रधानांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवित त्यांना खऱ्या अर्थाने न्यू ईअर गिफ्ट दिले आहे.

पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे न आल्यास शेतकरी खालील क्रमाकांवर तक्रार दाखल करु शकतात.

पीएम किसान टोल फ्री नंबर: १८००११५५२६६
पीएम किसान हेल्पलाईन नंबर: १५५२६१
पीएम किसान हेल्पलाईन नंबर: ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसान योजनेची नवी हेल्पलाईन: ०११-२४३००६०६

Exit mobile version