कोंबडी खताचे असतात खूप फायदे; वाचा सविस्तर

kombadi-khat

पुणे : सध्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर त्याचे प्रमाण हे 0.5 टक्केच्याखाली चालले आहे. त्यामुळे जमिनी मधील सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांना कोंबडी खत आहे उत्तम पर्याय आहे. कोंबडी खते वापरल्याने मातीची भौतिक,रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. कोंबडी खताचा विचार केला तर या खताची प्रत ही कोंबडीची जात,वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य, कोंबडीचे खाद्य, जागा व पाण्याचा वापर यासारख्या घटकांवर अवलंबून असते. या लेखात आपण कोंबडी खताचे फायदे जाणून घेणार आहोत.

कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कोंबडी खतामध्ये मुख्यतः १३ अन्नद्रव्ये असतात. सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे ०.५ टक्क्याच्या खाली चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो. ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.

कसे तयार होते खत

कोंबड्यांची विष्ठा, कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे कोंबडी खत. कोंबडी खताची प्रत ही कोंबडीची जात, वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य, कोंबडी खाद्य, जागा, पाण्याचा वापर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते.

कोंबडी खत केव्हा वापरावे

मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी.
ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळू नये. जर उभ्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे. म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
उभ्या पिकात खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. नसेल तर पीक पिवळे पडते. ताजे कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये. जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी ५ ते २० टन खताचा वापर करावा.

खत तयार करण्याची पद्धत

पोल्ट्री शेडमधील लिटर शेडच्या बाहेर काढल्यानंतर त्याचे व्यवस्थित थर लावावेत.
एक टन कोंबडी लिटरसाठी दोन किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धक मिसळावे.
पुरेसा ओलावा (३० ते ४० टक्के) राहील एवढे पाणी शिंपडावे.
खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा नियमित चाळणी करावी.
खताच्या ढिगाचे तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअस एवढे राखावे.
चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
सध्या कोंबडी खत हे व्यावसायिक स्वरूपात ही तयार करतात. कोंबडी खताच्या पॅलेट ५ ते २५ किलोच्या बॅगेत मिळतात.

चांगल्या खताचे गुणधर्म

खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा
खताचा सामू ६.५- 7.५ दरम्यान असावा.
कणांचा आकार ५ ते १० मिमी असावा.
कर्ब नत्र गुणोत्तर १:१० ते १:२० दरम्यान असावे.
जलधारणाशक्ती ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी.

कोंबडी खताचे महत्त्व

कोंबडी खतामध्ये तेरा अन्नद्रव्ये असतात. त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असतं. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, यूरिक ॲसिडया प्रमाणात आढळते. मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सोडियम, बोरन, झिंक, कॉपर, इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

हे देखील वाचा :

Exit mobile version