मिरची पिकावरील राेग व उपाययोजना; वाचा a टू z माहिती

रोजच्या या आहारात मिरची ही अत्यावश्यक असते. उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. बाजारात हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरजी भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्ट्र मिरचीची लागवड अंदाजे १ लाख हेक्टरी क्षेत्रावर होते.

महाराष्ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी ६८ टक्के क्षेत्र नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे . मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हेक्टरी महत्वाचे मसाल्याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्दा होतो .

१) मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो , लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात . रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात . त्यामुळे रोप कोलमडते . उपाययोजना : १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड ५० टक्के मिसळून हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळा भोवती ओतावे .

२) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे – ( फ्रूट रॉट अँड डायबॅक ) अ) हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. ब) दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात . अशी फळे कुजतात आणि गळून पडतात . क) बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जाता. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात. 

उपाययोजना : अ ) या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा . तसेच डायथेन झेड -७८ किंवा डायथेन एम ४५ किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध २५ ते ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे . ब ) पुसा सदाबहार या प्रतिकारक जातीची लागवड करावी . 

३ ) भुरी ( पावडरी मिल्डयू ) – भूरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या या बाजूवर पांढरी भूकटी दिसते . या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.

उपाययोजना : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा १० मिलीलिटर कॅराथेन १० लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या या पिकावर १५  दिवसांच्या अंतराने दाेन फवारण्या कराव्यात.

Exit mobile version