सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्ष नाही; या नेत्याने डागली तोफ

Success farmer

अहमदनगर : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्ष नाही. सत्ताधारी भांडणातच मशगुल आहेत. त्यामुळं आता शेतकर्‍यांनीचं ठरवाव, चोरांच्या मागे जावं की नाही अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली. गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच शेतकर्‍यांबद्दल सरकारची एव्हढी असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा पाहतोय. सवंग लोकप्रियतेसाठी नुसत्या घोषणा सुरु आहेत. सरकारला लाज वाटली पाहीजे अशी घणाघाती टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद संपन्न झाली. यावेळी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावे. यावर्षी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, हंगाम संपल्यानंतर ३५० रपये दिले जावेत, अशा विविध मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास १७ आणि १८ नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशाराही शेट्टींनी यावेळी दिला.

राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत. तसेच सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या सात नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शेट्टींनी यावेळी दिला आहे. मुकादमांकडून शेतकर्‍यांची आर्थिक लुट होत असल्यानं मुकादम व्यवस्था संपवावी. बांधकाम मजुरांप्रमाणं महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकर्‍यांची देखील फसवणूक करतात असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

Exit mobile version