शेतकर्‍यांचे रास्तारोको आंदोलन; राज्य सरकारकडे केल्या या मागण्या

farmer andolan

नांदेड : जुलै आणि १५ ऑगस्टपर्यंत पावसाचे सातत्य काय असल्याने खरिपातील सर्व पिके ही तब्बल दीड महिना ही पिके पाण्यात राहिलेली आहेत. यात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यापार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा, या मागणीसाठी नांदेड-लातूर मार्गावर शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले.

यंदा नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने केवळ आश्‍वासने न देता शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस भुमिका घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील शेतकर्‍यांनी आंदोलन केले. नांदेड-लातूर या महामार्गावर शेकडो शेतकर्‍यांनी ठिय्या दिला.

या आहेत शेतकर्‍यांच्या मागण्या
यंदा तब्बल दीड महिना पावसामध्ये सातत्य राहिल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्‍यांना भरपाईच्या अनुशंगाने जिरायतीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये ते देखील आणि फळबागांसाठी हेक्टरी १.५० लाख रुपये आर्थिक मदत करावी. आदी मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत.

Exit mobile version