केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापनामार्फत रोगग्रस्त केळी पिकाची पाहणी

diseased banana crop

जळगाव : कृषि व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार संचालित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील मौजे मस्कावद येथे भेट देऊन केळी पिकावर आलेल्या “कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही)” या रोगाने ग्रसित केळी पिकांची पाहणी केली. यावेळी खासदार रक्षाताई खडसे या देखील होत्या.

महाराष्ट्र राज्यात केळी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र जळगांव जिल्ह्यात असून केळीचे सर्वाधिक उत्पादनही जळगांव जिल्ह्यातील तापी व पुर्णा नदीच्या काठाने असलेल्या भागात होते. केळी करपा हा केळी पिकावरील महत्वाचा बुरशीजन्य रोग व कुकुंबर मोझाक व्हायरस मुळे दरवर्षी केळीचे मोठ्या प्रमाणावार नुकसान होते. सीएमव्ही हा रोग जास्तकरून ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये जास्त आढळून येत असतो. त्यातच अवकाळी वादळ. जोरदार पाऊस, गारपीट व कमी-जास्त तापमान यामुळे चिंतेत असलेला शेतकऱ्यांना मोठे संकट उभे राहते.

याबाबत केंद्रीय कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन व सध्याचे कृषिमंत्री व कृषी सचिव यांना सदर रोग केंद्राच्या “राष्ट्रीय कृषी विकास योजना” मध्ये समावेश होणे तसेच केळी पिक विम्यात याचा समावेश होणे बाबत मागणी केली होती. त्यानुसार कृषि व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार संचालित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील केळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सांगून अहवाल सादर करणे बाबत योग्यत्या सुचना केल्या.

यावेळी माझ्यासह केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिकचे सहायक संचालक डॉ.अतुल ठाकरे, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषीकेश मानकर, शास्त्रज्ञ केळी संशोधन केंद्र, जळगाव जी.पी.देशमुख, तालुका कृषी अधिकारी रावेर मयूर भामरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, रावेर चंद्रकांत माळी व भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी सभापती जितेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, तालुका चिटणीस श्री.विजय महाजन, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका सौ.सारिका चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.रेखा बोंडे, राजेंद्र पाटील, श्री.विजय महाजन, संजय महाजन, हरलाल कोळी, शुभम पाटील, संदेश महाजन, पंकज चौधरी यांच्यासह परिसरातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version