शेडनेट हाऊस/प्लास्टिक टनेल/हरितगृह अनुदान हवे असल्यास हे वाचा

shed

नाशिक : शेडनेट हाऊस व हरितगृह यांच्या वापरामुळे फुलपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादन हे कमी क्षेत्रात अधिक मिळते. त्यासाठी शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक टनेल इत्यादी आधुनिक कृषी तंत्राचा वापर रोपवाटिका तयार करण्यासाठी करतात. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट्य शेतकर्‍याने बिगर हंगामी उत्पादन चांगल्या प्रतीचे घेऊन अधिकाधिक नफा कमवावा असे आहे, आणि त्यासाठीच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत यांकरिता शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्यात येते. या संबंधी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेडनेट हाऊस अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी ज्याची एकूण भूधारण २ हेक्टर पर्यंत आहे, तो शेतकरी या घटकांतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
अल्प/अत्यल्प भूधारक,अनुसूचित जाती जमाती महिला , दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येईल.
यापूर्वी सादर घटकांतर्गत इतर शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ घेतल गेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादित घेता येईल.

शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा
जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जातीजमाती असल्यास)
८- अ प्रमाणपत्र

शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अर्ज कुठे करायचा?
इच्छुक शेतकऱ्यांनी  http://https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर किंवा DBT  APP द्वारे ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

शेडनेट हाऊस क्षेत्र मर्यादा
एका लाभार्थ्यास शेडनेटसाठी (राउंड टाईप) कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत व (फ्लॅट टाईप) साठी कमीत कमी १००० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल. यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील. या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना या बाबीचे तांत्रिक प्रक्षिशण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील. सदर प्रशिक्षणाची सोय राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रशीक्षण संस्था, तळेगाव दाभाडे, तालुका वडगाव मावळ, जिल्हा पुणे येथे आहे. सादर प्रशिक्षणासाठी आवश्यक शुल्काची पूर्ण रक्कम नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मार्फत अदा करणेत येईल.

हरितगृह खर्चाचे मापदंड
शेडनेट हाऊस मध्ये फ्लॅट टाईप व राउंड टाईप असे दोन प्रकार आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु. ७१०/- प्रति चौ मीटर व डोंगराळ क्षेत्रासाठी रु. ८१६ प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे.
हरितगृहासाठी ५६० चौ मीटर करीता – रु. ५२३६००/-, १००८ चौ मीटर करिता रु. ९४२४८०/-, २०१६ चौ. मीटर करिता – १७९४२४०/-, ३१२० चौ. मीटर करिता – रु. २६३३२८०/-, तसेच ४००० चौ मीटर करिता – रु. ३३७६०००/-

Exit mobile version