तूर उत्पादक शेतकर्‍यांनो हे वाचा अन्यथा होवू शकते नुकसान

tur

पुणे : भारताला कडधान्य उत्पादनात स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु हवामानाच्या अनिश्चिततेमुळे कडधान्यांची लागवड करणे आणि उत्पादन घेणे कठीण होत आहे. हवामान बदलामुळे कीटक-रोगांचा प्रादुर्भावही वाढत आहे. चालू खरिप हंगामात तूर या पिकालाही याचा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे तूरीमध्ये कीडरोग वाढण्याची शक्यता असल्याने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी तूर पीक व्यवस्थापनाबाबत काही सूचना केल्या आहेत.

तूर पिकातील तण व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी तण काढणे सुरू करावे, त्यामुळे शेतात तण वाढण्याची शक्यता कमी होते. यासाठी तण उपटून शेताबाहेर फेकून द्यावे. याशिवाय पिकांच्या पेरणीपूर्वी तणनाशक जमिनीत मिसळावे, कारण नंतर या औषधांचा वापर पिकाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. याशिवाय पावसाचे पाणी पिकांमध्ये साचणार नाही, यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करा.

तूरीमध्ये मोथा गवत सारखे तण झपाट्याने वाढतात. या तणाच्या मुळांमध्ये एक गाठ असते, जी तण कापल्यावर जमिनीत राहते आणि तण पुन्हा उगवते. याशिवाय तणांच्या शास्त्रोक्त नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी प्रभावी ठरते. काटेरी पानावरील तणांच्या प्रतिबंधासाठी २५० ग्रॅम पेंडीमिथिलीन किंवा मेट्रिब्युझिन ४०० लिटर पाण्यात विरघळवून फवारणी केल्यास फायदा होतो.

Exit mobile version