‘नाफेड’ कडूनच शेतकर्‍यांची फसवणूक; वाचा काय आहे प्रकरण

nafed

लासलगाव : शेतमालाचा हमीभाव ठरविण्यात महत्वाची भुमिका असणार्‍या नाफेडकडून राज्यातील विविध बाजारपेठांमधून कांदा खरेदी सुरु आहे. शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी करताना तो एकाच दरात करणे अपेक्षित आहे. मात्र, नाशिक बाजार समितीमध्ये १२ रुपये किलोप्रमाणे तर अहमदनगर येथे १० रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे ‘नाफेड’च्या भूमिकेबाबतच कांदा उत्पादक संघटनेने संशय उपस्थित केला आहे. यामुळे कांद्याला अगोदर हमीभाव ठरवून द्यावा आणि मगच खरेदी करावी अशी भूमिका कांदा उत्पादक संघटनेने घेतली आहे.

सध्या नाफेडच्या माध्यमातून राज्यातील मुख्य बाजारपेठेत कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, शेतकर्‍यांकडून घेतला जात असलेल्या कांद्याच्या दरातही तफावत आढळून येत आहे. लासलगाव मार्केटमध्ये १२ रुपये किलोप्रमाणे तर अहमदनगर येथे १० रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे नाफेड चा उद्देश शेतकर्‍यांच्या हिताचा आहे की, नुकसानीचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाफेड ही संस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून धान्याची खरेदी करुन साठा करते. उर्वरीत काळात धान्याची टंचाई निर्माण झाली किंवा वाजवीपेक्षा अधिकचे दर झाले तर हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी बाहेर काढला जातो. गेल्या काही महिन्यापूर्वीच कांद्याच्या दरात वाढ होताच हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा साठवणूकीतला कांदा मार्केटमध्ये पाठवून दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता.

Exit mobile version