राज्यात विक्रमी १ कोटी ३ लाख टन साखरेचे उत्पादन

sugar

शिर्डी : राज्यातील सुरू असलेल्या १९८ साखर कारखान्यांपैकी १३२ कारखान्यांचे धुराडे बंद झाले असले तरी राज्यात अजूनही सुमारे ४५ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान आतापर्यंत राज्यात उसाचे १ कोटी ३ लाखांच्या वर विक्रमी गाळप करून १ कोटी ३५ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे.

राज्यात यंदा सोलापूर विभागातील साखर कारखान्यांनी उसाच्या गाळपात आघाडी घेतली असून २९८ लाख टनांचे उसाचे गाळप केले, तर साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने ३०० लाख टन उसाचे उत्पादन करत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. नगर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी उच्चांकी १ कोटी ४६ लाख ३८४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले, तर १ कोटी ४४ लाख ७७ हज़ार १८७ साखर पोत्यांची निर्मिती केली.

हे देखील वाचा : साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी, हे आहे मुख्य कारण; वाचा सविस्तर

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसमोर शिल्लक उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गाळपाअभावी शेतात उभ्या असलेल्या उसाला राज्य सरकारने एकरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version