हृदयरोग, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलवर गुणकारी लालभेंडी

red-lady-finger-benefits

शेत शिवार । भोपाळ : महाराष्ट्रात भेंडीचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. सर्व शेतकरी बाजारात सहज उपलब्ध होणारी हिरव्या रंगाच्या भेंडीचे उत्पादन घेतात. मात्र भोपाळमधील एका शेतकर्‍याने लाल भेंडीचे भरघोस उत्पादन घेवून लाखों रुपये कमविण्याचा विक्रम करुन दाखविला आहे. लाल भेंडी अतिशय चविष्ट आणि पौष्टीकही आहे. या लाल भेंडीचा स्वाद सुद्धा सामान्य भेंडी पेक्षा वेगळा आहे. तसेच भेंडी शिजण्यासाठी फार कमी वेळ लागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, ही लालभेंडी हृदयरोग, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलवर गुणकारी आहे.

लाल भेंडी ही युरोपिय देशातील पिक

भोपाळच्या खजुरीकला गावातील शेतकरी मिश्रीलाल राजपूत हे काही कालावधीपूर्वी वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च सेंटरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना लाल भेंडीबाबत माहिती मिळाली. इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूटने याची स्वदेशी जात ‘काशी लालिमा’ तयार केली आहे.  मिश्रीलाल यांनी ‘काशी लालिमा’ या लाल भेंडीचे बियाणे आणून या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरले. त्यांचा हा प्रयोग संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आपल्याकडे भेंडी म्हणजे हिरवी भेंडी हेच समिकरण राहिले आहे. लाल भेंडी ही युरोपिय देशातील पिक आहे. पण आता ही भेंडी भारतातही पिकवली जात आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर

हिरव्या भेंडीच्या तुलनेत या ला भेंडीचे पिक ४५ ते ५० दिवसांत येते. एका रोपाला किमान ५० भेडीं लागतात. एक एकर शेत जमिनीवर ४० ते ५० क्विंटल लाल भेंडीचे उत्पादन होऊ शकते. ही लाल भेंडी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे. ही भेंडी मोठमोठे मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये विकली जाते. बाजारात या लाल भेंडीची किंमत ही ३५० ते ४०० रुपये २५० ते ५०० ग्रॅम इतकी आहे. म्हणजेच एक किलो लाल भेंडी ही ८०० रुपयांना विकली जाते. आरोग्याच्या दृष्टीने लाल भेंडी अत्यंत फायदेशिर मानली जात असल्याने त्यास मोठी मागणी असते. लाल भेंडीमध्ये एंटीऑक्सीडेंट आणि आयर्न जास्त प्रमाणात असते. आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. या लाल भेंडीत एंथोसाय निन नावाचे एक खास तत्व आहे. एंथोसायनिनमुळे गर्भवती महिलांना, तजेलदार त्वचा आणि मुलांचा मानसिक विकास करण्यासाठी उपयोगी आहे. सर्वांत महत्त्वाची आणि चांगली बाब म्हणजे या लाल भेंडीला मच्छर किंवा इतर किटकं खात नाहीत. भेंडीचा रंग लाल असल्यामुळे भेंडीला कीड लागत नाही. 

Exit mobile version