सेंद्रीयच्या नावाखाली विकल्या जाणार्‍या शेतमालाला बसणार आळा; ही आहे सरकारची यंत्रणा

nano-fertilizer

पुणे : आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रीय शेतीमालाची मागणी होते पण प्रत्यक्ष तो शेतीमाल सेंद्रीय पध्दतीने पिकवला आहे का? याचे मूल्यमापन होत नाही. यामुळे ग्राहकांना आपण खरोखरच सेंद्रीय शेतमाल खातोय का? हे कळत नाही. बर्‍याचवेळा सेंद्रीयच्या नावाखाली रासायनिक मालाची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेवून सेंद्रीय शेतीमालाची गुणवत्ता तपासणीसाठी आता प्रमाणीकरणाची स्वतंत्र्य यंत्रणेची स्थापना केली जाणार आहे.

राज्य सरकारने बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या धर्तीवर सेंद्रीय शेताीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणेप्रमाणेच ही शेतीमाल प्रमाणीकरणाची संस्था नोंदणी करावी लागणार आहे.

अपेडाने सेंद्रीय शेतीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची अट घातली होती. त्यामुळे ह्या यंत्रसामुग्री उभारण्याचे काम रखडले होते. पण आता हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच ही प्रणाली उभराली जाणार आहे. शिवाय सेंद्रीय शेतीमालाच्या प्रमाणीकरणमुळे ग्रामस्थांचा चांगल्या दर्जाचा माल मिळणारच आहे पण सेंद्रीय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढणार आहे.

Exit mobile version