शेतशिवार । सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान अधारित फळपीक विमा योजनेचा लाभ लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
रिलायन्य जनरल इन्शुरन्स कंपनीने कृषी कार्यालयाला याविषयी अधिकृत माहित दिली आहे. त्यानुसार सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना हि विमा रक्कम मिळणार आहे. याचा सुमारे १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून १८ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये फळपीक विमा मंजूर करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरतांना शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ही रक्कम विमा कंपनीतर्फे जमा करण्यात येणार आहे. यासाठी विमा कामिनीच्या नियमित संपर्कात असल्याचे कृषी कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी आणि कंसात मिळणारी भरपाई :
अक्कलकोट- १८ (२ लाख ६२ हजार रुपये), बार्शी- १०७ (१५ लाख ५ हजार रुपये), करमाळा- ६५ (१० लाख ४९ हजार रुपये), माढा- ७९ (१० लाख ४४ हजार रुपये), माळशिरस- ६०४ (७७ लाख ३८ हजार रुपये), मंगळवेढा- ४३५० (चार कोटी ६० लाख ७५ हजार रुपये), मोहोळ -२९ (एक लाख ६० हजार रुपये), पंढरपूर- ६१० (६१ लाख ४ हजार रुपये), सांगोला -१० हजार ९८५ (१२ कोटी ५६ लाख सहा हजार रुपये), दक्षिण सोलापूर- २१ (२ लाख ४३ हजार रुपये).