रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ; डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं

fertilizers

नांदेड : वाढत्या महागाईचे झळ सर्वच क्षेत्रांना बसत आहे, यास कृषी क्षेत्रही अपवाद नाही. ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या असून सर्वाधिक मागणी असलेली डीएपी खत १५० रुपयांनी महागले आहे.

रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रासायनिक खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. शेतकर्‍यांची ही भीती खरी ठरली आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी खरीप हंगामात डीएपी खतालाच पसंती देतात. सर्वच पिकांसाठी हे खत संतुलित असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खतालाच अधिकची मागणी हे दरवर्षी असते. खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आणि गव्हासाठी याच खताचा अधिकचा वापर केला जातो.

१८:४६ (डीएपी) या खतानेच पिकाला चांगला उतार येतो, अशी शेतकर्‍यांची प्रबळ मानसिकता झाली आहे. यामुळे या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, १८:४६ हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी १०:२६:२६, १२:३२:१६, १५:१५, २०:२०:०० या खतांचा पर्यांय शेतकर्‍यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वापर करुनही भरघोस उत्पादन घेता येते.

हे पण वाचा :

Exit mobile version