अरे देवा…. खरिपाच्या तोंडावर खतासह बियाणांचेही दर वाढले

Seeds

पुणे : खते व बियाणे टंचाईची चिंता शेतकऱ्यांना सुरुवातीपासून सतावत होती. अजून टंचाई नसली तरी दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक यासारखी कारणे पुढे करीत रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये 18 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Rising prices of seeds and chemical fertilizers)

हंगामाच्या सुरवातीलाच महाबीजने सोयाबीन या मुख्य पिकाच्या बियाणे दरात वाढ केली होती. त्यानंतर हंगाम सुरु होईपर्यंत सर्वच बियाणे कंपन्यांनी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस हेच खरिपातील मुख्य पिके आहेत. सोयबीन आणि कापसाच्या बियाणे दरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. असे असताना दुसरीकडे सोयाबीनच्या दरात वाढ झालेली असून ही जमेची बाजू असल्याचे उद्योजक मनमोहन कलंत्री यांनी सांगितले आहे.कापसाचे बियाणे गेल्यावर्षी 475 ग्रॅम हे 767 रुपायांना तर यंदा 810 रुपयांना मिळत आहे. सोयाबीनची 30 किलोची बॅग गेल्या वर्षी 3 हजार 900 रुपयांना तर यंदा 4 हजार 350 रुपयांना मिळत आहे.

खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी शेतकरी रासायिनक खतांचा वापर करतातच. त्यामुळे डीएपी खताची बॅग गतवर्षी 1 हजार 200 रुपये तर यंदा 1 हजार 350 रुपयांना मिळत आहे. 10:26:26 हे गतवर्षी 1 हजार 250 तर यंदा 1 हजार 470, 20:20:0:13 हे खत गेल्या वर्षी 1 हजार 200 तर आता 1 हजार 450, एमओपी हे खत गेल्यावर्षी 900 रुपयांना तर आता 1 हजार 700 रुपयांना मिळत आहे. एसएसपी हे गतवर्षी 330 तर यंदा 450 रुपयांना बॅग याप्रमाणे घ्यावे लागत आहे.

Exit mobile version