‘महाबीज’कडून शेतकर्‍यांची लूट; सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत तब्बल १ हजार ७०० रुपयांची वाढ

soyabean

पुणे : खरिप हंगामात शेतकर्‍यांना महागाईची चिंता सतावत होतीच ऐन हंगामावेळी रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ होण्याची भीती सतावत होती. मात्र महाबीजनेच शेतकर्‍यांची लूट सुरु केली आहे. महाबीजने सोयाबीन बियाणांच्या किंमतीमध्ये तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. म्हणजेच ३० किलो सोयाबीन बियाणाच्या मागे जवळपास १ हजार ७०० रुपये शेतकर्‍यांना अधिकचे मोजावे लागणार आहेत. गतवर्षी महाबीज सोयाबीनची बॅग ही २ हजार २५० रुपयांना होती तर आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकर्‍यांना ३ हजार ९०० रुपये मोजावे लागत आहेत.

हे देखील वाचा :

महाबीज प्रशासनाने आपल्या बियाणांचे दर घोषित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महत्वाचे असणारे सोयाबीनच्या किंमतीमध्ये तब्बल ४० टक्के अशी वाढ केली आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणाची ३० किलोच्या बॅगेसाठी २ हजार २५० रुपये मोजावे लागत होते आता हीच बॅग तब्बल २ हजार रुपयांनी महागली आहे. गतवर्षी काढणी दरम्यान झालेल्या पावसामुळे अपेक्षित असे बियाणे मिळाले नाही. त्यामुळे महाबीजला पुन्हा उन्हाळी हंगामात बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला होता.

महाबीज बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवत असताना सोयाबीनचे जे दर असतात त्यावर काही टक्के बोनस देऊन कच्चे बियाणे विकत घेतले जाते. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या दरम्यानचे दर, बियाणांवर प्रक्रिया, पॅकिंग आणि तयार झालेले बियाणे विक्रेत्यांपर्यत पोहचवण्यासाठी येणारा खर्च पाहता ही वाढ करण्यात आली आहे.

Exit mobile version