कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून खतांची लिंकिंग; शेतकर्‍यांची लूट सुरुच

Fertilizers

जळगाव : राज्य सरकार व कृषी विभाग खरिप हंगामात शेतकर्‍यांना विविध आश्‍वासने देत सर्व काही ऑल ईज वेल असल्याचा देखावा करत असला तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पार वेगळीच आहे. कापसाच्या बियाण्यांची विक्री १ जून नंतरच सुरु होईल, अशी कृषी विगाची आग्रही भुमिका असली तरी काही ठिकाणी शेतकर्‍यांनी आडमार्गाने कापसाचे बियाणे मिळवून पेरण्यांना सुरुवात केली आहे. दुसरीकडे रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री केली जात आहे. शिवाय लिंकिंगही कायम आहे.

खरीप हंगामात डीएपी खताला मोठी मागणी असते. शेतकर्‍यांच्या या मागणीचाच गैरफायदा हे विक्रते घेत आहेत. या खताची मूळ किंमत यंदा १ हजार ३५० एवढी आहे तर सध्या बाजारपेठेत १ हजार ४५० ने विक्री सुरु आहे. एका पोत्यामागे १०० रुपये अधिकचे आकारले जात आहेत. शेतकर्‍यांनी डीएपी खत विकत घेतले की त्याला लागूनच इतर खतही खरेदी करावे लागते. इतर कंपनीचे खत विक्री व्हावे म्हणून असा फंडा विक्रेते काढत आहेत पण लिंकिंगने खताची खरेदी करावी असे बंधन नाही.

खरिपपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना मोठ मोठी आश्‍वासने दिली असली तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाहीये. शेतकर्‍यांची आर्थिक लूट टाळणसाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत आहे. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन विक्रेते अधिकचा दर तर आकरतातच पण कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांना अडचणीतही आणत आहेत.

यंदा बिजोत्पादनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही अशी स्थिती होती. मात्र, अधिकच्या तापमनामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाला होता. त्यामुळे हे बियाणे आता वापरण्यायोग्य राहणार नाही. ही परिस्थिती पाहता महाबीजने देखील आडमुठी भुमिका घेत २ हजार रुपयांची वाढ म्हणजेच २ हजार २०० रुपयांना असणारी सोयाबीनची ३० किलोची बॅग ही आता ४ हजार २०० रुपयांना मिळणार आहे.

Exit mobile version