शास्त्रज्ञांनी शोधला काकडीचा असा वाण ज्यापासून शेतकर्‍यांना मिळेल बंपर उत्पादन

kakadi

पुणे : सॅलडमध्ये काकडीला अनेकांची प्रथम पसंती असते. काकडीला केवळ देशातर्गंत बाजारपेठच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. यामुळे निर्यातीच्या बाबतीतही काकडीचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक शेतकरी काकडीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. आज आपण काकडीच्या अशा वाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्याला वातावरणातील बदल किंवा अन्य कोणत्याही कीडरोगांचा परिणाम जाणवत नाही. आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी अनेक वर्षे मेहनत करुन हे सीडलेस वाण तयार केले आहे.

आयसीएआरच्या शास्त्रज्ञांच्या मते, डीपी-६ नावाची ही बिया नसलेली काकडी एका वर्षात ४ वेळा वाढू शकते. काकडीची ही जात पेरणीनंतर ४५ दिवसांनी फळ देण्यास सुरुवात करते. एवढेच नाही तर बियाणे नसलेल्या काकडीला फळे लागल्यानंतर ३ ते ४ महिने फळ येत राहते. त्याची साल देखील खूप पातळ आहे. विशेष म्हणजे या काकडीत कोणताही कडवटपणा नसतो.

डीपी ६ जातीच्या वेलीवर जितकी मादी फुले येतात, तितकीच फळेही तयार होतील. डीपी-६ जातीच्या काकडीची सुमारे ४०० झाडे १०० चौरस मीटर शेतात लावली जाऊ शकतात, त्यापैकी ४ किलो काकडी तयार होऊ शकते. या डीपी-६ जातीच्या काकडीच्या संरक्षित लागवडीसाठी, केंद्र सरकारच्या संरक्षित लागवड योजनेचा लाभ घेऊन, चांगले उत्पादन घेऊन शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. या जातीच्या काकडीच्या लागवडीत शेतकर्‍याला कमी खर्चातही चांगला नफा मिळेल.

Exit mobile version