मानसिक तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांनो येथे मन मोकळे करा

sad farmer

जळगाव : राज्य व केंद्र सरकार शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतांना या समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, आपणही समाजाचे देणं लागतो, या भावनेने जळगाव येथील भरारी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतर्फे गत दीड वर्षांपासून शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात येत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे संस्थेतर्फे शेतकर्‍यांसाठी मोफत समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव येथे कार्यरत असणार्‍या शेतकरी समुपदेशन केंद्रात मानसिक तणवाखाली असलेल्या शेतकर्‍यांचे व व त्यांच्या कुटुंबांचे समपुदेशन करणे शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणे व योजनेत बसत असलेल्या शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळऊन देणे या सर्व शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी हेल्पलाईन (8329469192/9067304797) देखील सुरु करण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्यांमागे अनेक कारणे असतात. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे, शेतकर्‍याने धरलेला अबोला. शेतकरी तणावात असतांना त्याचे दुख: तो कुणाशीही शेअर करत नाही, यामुळे त्याचे नैराश्‍च वाढतच जाते. यामुळे जर त्याने त्याबाबत कुणाशी तरी मन मोकळे केले तर त्या समस्येतून काहीतरी मार्ग निघू शकतो, यामुळे भरारी फाऊंडेशनचे शेतकरी समुपदेशन केंद्र मोठी भुमिका निभवू शकते, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले. भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Exit mobile version