तलाठ्यांमार्फत भरता येणार आता ‘ऑनलाईन’ शेतसारा

shetsara talathi

लातूर : ई-पीक पाहणी, ऑनसातबारा उतार्‍यानंतर ई-चावडी उपक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतजमिनीसह, अकृष जमिनींचा महसूल भरता येणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या ई-पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात असून राज्यात १ ऑगस्टपासून ही सोय शेतकर्‍यांसाठी खुली केली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राज्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे.

या प्रक्रियेअंतर्गत खातेदाराला तलाठ्यांकडून पहिल्यांदा नोटीस पाठवली जाणार आहे. त्यानंतर ई-चावडी प्रकल्पांमधील नागरिकांची तलाठी कार्यालयात ती नोटीस दिसेल. त्यानंतर त्या नोटीसवर क्‍लिक करुन शेतकर्‍यांना रक्कम अदा करता येणार आहे. शेतसारा भरलेल्या रकमेची पावतीही त्याच ठिकाणी शेतकर्‍यांना मिळणार आहे. तलाठी हे जमा झालेला शेतसारा महसूल प्रशासनाकडे जमा करणार आहेत.

महसूल विभागाच्या माध्यमातून जमिनीच्या प्रकारानुसार बिन शेतीचा दंड, शेतसारा, नजर अंदाजे रक्कम आदी प्रकारचे कर, गाव नमुना हा क्रमांक १७ प्रमाणे वसुल केला जातो. त्याचे संगणीकृतकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या संगणीकरणाचे काम तलाठ्यांच्या लक्षात येईल असे सॉफ्टवेअर बनविण्यात येणार आहे. ई-चावडीअंतर्गत यामध्ये नोंदी करुन घेतल्या जाणार आहेत. यापुढचा टप्पा हा शेतसारा वसुलीचा आहे. याकरिता सर्व विभागातील निवडक जिल्हे आणि त्यामधील गावे प्रायोगिक तत्वावर निवडण्यात आली आहेत.

Exit mobile version