स्मार्टफोनने शेताची किंवा जमिनीची अचूक मोजणी करता येते; जाणून घ्या कशी?

smartphone

पुणे : शेतीच्या बांधांवरुन होणार्‍या वादांचे मुख्य कारण म्हणजे, कुणाची जमीत किती आणि त्याची हद्द कोणती? अशावेळी जमीनीचे अचूक मोजमाप करणे आवश्यक असते. किंवा जमीनचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांनाही जमिनीचे मोजमाप करावे लागते. ही थोडीशी किचकट प्रक्रिया समजली जाते. मात्र आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटात शेताची किंवा जमिनीचे अचूक मोजमाप करु शकता.

कोणत्याही टेपविना शेत किंवा जमिनीचे मोजमाप करण्यासाठी शेतकर्‍यांकडे केवळ एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. ज्यात इंटरनेट आणि जीपीएसची सुविधा असेल. स्मार्टफोनवर शेताचे किंवा जमिनीचे मोजमाप कसे करावे? याची सविस्तर व स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे.

१) सर्वप्रथम शेतकर्‍यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरमधून डिस्टन्स अ‍ॅण्ड एरिया मेझरमेंट (distance and area measurement) हे अ‍ॅप डाऊनलोड करावे.
२) हे अ‍ॅप ओपन केल्यानंतर अंतर, मीटर, फूट यार्ड इत्यादीसाठी मोजमापांपैकी एक पर्याय निवडावा. जर शेतकरी बांधव शेतजमिनीचे मोजमाप करत असतील तर ते क्षेत्रासाठी एकर निवडू शकतात.
३) त्यानंतर अ‍ॅपच्या खालील बाजूला एक स्टार्ट बटन दिसेल, जे दाबून तुम्हाला मोजण्यासाठी जमिनीभोवती पूर्ण फेरी मारावी लागेल. तुमची एक फेरी पूर्ण होताच, त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या जमिनीचा पूर्ण आकार कळेल. या ऍप्लिकेशनद्वारे शेतकरी बांधव जमिनीच्या आकारमानाचा अंदाज बांधू शकतात. हा एक साधा आणि सोपा मार्ग आहे. एकदा की तुम्ही मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केले की कोणत्याही जमिनीचे मोजमाप करणे सहज शक्य होईल.

मोबाईलद्वारे जमिनीचे मोजमाप करण्याचे फायदे
मोबाईलने जमिन मोजण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
पटवारी (शेतमापक) शिवाय तुम्ही तुमच्या शेताचे मोजमाप सहज करू शकता.
मोजमाप करतांना कोणताही टेप किंवा मोजमापक पट्टीची आवश्यकता भासत नाही.

Exit mobile version