Soil Health Card : काय आहे मृदा आरोग्य कार्ड योजना, असा होईल शेतकऱ्यांना फायदा

Soil-Health-Card

Soil Health Card Scheme : पिकाची काळजी कशी घ्यावी हे शेतकर्‍यांना कळले तर शेतकर्‍यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळू शकते. यासाठी मातीची पोषक द्रव्ये तपासणे आवश्यक आहे. याच दृष्टीने भारतात सॉईल हेल्थ कार्ड अर्थात मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश जमिनीतील पोषक घटक तपासणे हा आहे. याच्या माध्यमातून लागवडीसाठी सुपीक जमीन ओळखून त्यामध्ये लागवडीचे घटक तपासले जातील आणि त्यानुसार कोणत्या पिकाची काळजी घेतली पाहिजे हे कळू शकेल. त्यामुळे उत्पादन चांगले मिळेल. Mruda Arogya Card Yojana

जमिनीतील पोषक तत्वांची तपासणी करून कोणती जमीन इतकी सुपीक आहे आणि त्यात किती पोषक तत्वांची गरज आहे. जमिनीत किती पोषक द्रव्ये आहेत हे माहीत नसताना जर आपण जमिनीत पोषक द्रव्ये टाकली तर आपण आवश्यकतेपेक्षा कमी-जास्त प्रमाणात खत घालू शकतो. कमी खत टाकल्यास उत्पादन कमी येते, तर जास्त खत घातल्यास केवळ खत आणि पैशाची हानी होते आणि त्याचा पुढील वेळेच्या उत्पन्नावरही परिणाम होतो. यासाठी मातीची तपासणी करण्याची आवश्यकता असते. सरकारी योजनांविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या ठिकाणी करता येईल मातीची तपासणी
तुम्ही नमुना जवळच्या कृषी विभाग कार्यालयात किंवा स्थानिक कृषी पर्यवेक्षकाकडे चाचणीसाठी सबमिट करू शकता. जर तुमच्या जवळ माती परीक्षण प्रयोगशाळा असेल तर तुम्ही तिथे जाऊन मोफत चाचणी करू शकता. जिल्हा स्तरावर प्रयोगशाळा कोठे आहे याची राज्यनिहाय माहिती farmer.gov.in या पोर्टलवर जाऊन मिळू शकते.

Exit mobile version