ऊस उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला

sugar

मुंबई : राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. गतवर्षी साखर कारखान्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम होता. गतवर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा ऊस गाळप हंगाम १५ दिवसांनी अगोदर सुरु होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री मंडळाची बैठक पार पडली आहे. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यंदा राज्यात ऊसाचे क्षेत्र १४ लाख ८७ हजार असून गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. हेक्टरी ९५ टन ऊसाचे ऊत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामात राज्यात २०३ साखर कारखाने हे सुरु होणार आहेत. १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणार्‍या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उतार्‍यासाठी प्रति मेट्रीक टन ३ हजार ५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे. गत हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप केले. शेतकर्‍यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version