शेतकर्‍यांनो सावध व्हा, ‘या’ जिल्ह्यात पकडला बनावट खताचा साठा

Stocks of fake manure

अमरावती : प्रत्येक हंगामात बनावट खतांचा विषय शेतकर्‍यांची डोकंदूखी ठरत असतो. आता खरीप हंगामाची तयारी सुरु असतांना बनावट खतांची विक्री करुन शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अमरावतीमध्ये तर याचे प्रमाण अधिकचे असून हंगाम सुरु झाल्यापासून दोन वेळेस बनावट खत ही जप्त करण्यात आले आहे.

कृषी विभागाने भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथून डीएपी खताची ६३ पोती ही जप्त केली आहेत. डीएपीच्या नावाखाली इतर बनावट खताची निर्मिती करुन शेतकर्‍यांची फसवणूक केली जात होती. मात्र, कृषी विभागाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर भरारी पथकातील अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. यामध्ये ८८ हजार रुपयांचे बनावट खत ताब्यात घेण्यात आले आहे.

सध्या पावसाने हजेरी लावली असून खत खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु असून याचाच फायदा खत विक्रेते घेत आहेत. अधिकच्या दराने बोगस खत विक्री केली जात आहेत. बनावट खत निर्मितीमधून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. बनावट खते शेतकर्‍यांनपर्यंत जाऊ नयेत याकरिता कृषी विभागाने बनावट पद्धतीच्या किंवा कमी किमतीचे खते विक्री निदर्शनात आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील केले आहे. मात्र, हंगाम सुरु झाल्यापासून अमरावतीमध्ये अशाप्रकारे दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनीही तेवढेच सतर्क राहणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी?
कृषी विभाागाची परवानगी नसताना शेतकर्‍यांनी बियाणांची खरेदी केल्यामुळे या शेतकर्‍यांना नुकसान झाले तरी मदत मिळेलच असे नाही. त्यामुळे उर्वरित शेतकर्‍यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.

Exit mobile version