टिश्यू कल्चर तंत्राने केळी लागवडीसाठी ‘या’ राज्यात मिळते ६२ हजार ५०० रुपयांचे अनुदान

banana tissue culture

जळगाव : कमी कलावधीत शेतकर्‍यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे. या तंत्राचा वापर करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकर्‍यांना प्रोत्साहन देत आहे. याच अनुषंगाने बिहार सरकारने केळीची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी टिश्यू कल्चरद्वारे केळीची लागवड करतील त्यांना ६२ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

टिश्यू कल्चरद्वारे केळीच्या लागवडीत त्याच्या सुधारित प्रजातींची रोपे तयार केली जातात. यामध्ये झाडे निरोगी व रोगमुक्त असतात. त्याच्या विकासापासून ते फुलण्यापर्यंत सर्व काही एकाच वेळी घडते. फळांचा आकार आणि प्रकारही अगदी सारखाच असतो. केळीचे पहिले पीक टिश्यू कल्चर तयार केलेल्या रोपांपासून लागवडीनंतर १२-१४ महिन्यांत मिळते. याउलट केळीची इतर पद्धतीने लागवड केल्यास फळे येण्यास १७ ते १८ महिने लागतात. याशिवाय शेतकर्‍यांना एका रोपातून ६० ते ७० किलो उत्पादनही मिळू शकते.

बिहार सरकारच्या म्हणण्यानुसार, टिश्यू कल्चरची लागवड करताना शेतकर्‍यांना एक हेक्टरमध्ये १ लाख २५ हजार रुपये खर्च येतो. यातील ५० टक्के म्हणजे ६२,५०० रुपये अनुदान म्हणून शेतकर्‍यांना मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी http://horticulture.bihar.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

Exit mobile version