नैसर्गिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी १२ हजार २०० रुपयांची मदत; जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचे धोरण

Success farmer

मुंबई : शेती व्यवसयात रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतजमिनीचे आणि पर्यायाने मानवाचेही आरोग्य बिघडत जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा विडा मोदी सरकारने उचललला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय नैसर्गिक प्रणाली ही योजनाही सुरु केली असून यंदा देशात ४ लाख हेक्टर क्षेत्रफळावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला जाणार आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माहिती दिली आहे.

कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, या पध्दतीने शेती करणार्‍यांना आर्थिक मदतही केली जाणार आहे. ३ वर्षासाठी हेक्टरी १२ हजार २०० रुपये मदत केली जाणार आहे. त्या अनुशंगाने देशभरात ४ लाख हेक्टरवर हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला जाणार आहे. देशभरातील ८ राज्यांसाठी ४९ कोटी ९९ लाख रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये केरळ आणि छत्तीसगडसाठी सर्वाधिक निधी राहणार आहे.

नैसर्गिक शेतीबरोबरच पारंपरिक देशी पध्दतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याकरिता केंद्राच्या माध्यमातून योजनाही राबवली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व कृत्रिम व रासायनिक खते वगळण्यावर भर देण्यात आला असून बायोमास मल्चिंग, शेण-मूत्र फॉर्म्युलेशनच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Exit mobile version