नैसर्गिक शेतीच्या ‘सुरत मॉडेल’ची संपूर्ण देशाला भुरळ; जाणून घ्या सविस्तर

organic-farming

सेंद्रिय शेती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नैसर्गिक शेती परिषदेला संबोधित करतांना सुरतमध्ये केल्या जाणार्‍या नैसर्गिक शेतीबाबत भाष्य केले. यामुळे नैसर्गिक शेतीच्या ‘सुरत मॉडेल’ नेमके काय आहे? याची माहिती जाणून घेण्याची अनेकांना उत्सूकता लागली आहे. सुरतमधून उदयास येणारे नैसर्गिक शेतीचे मॉडेल संपूर्ण भारतासाठी आदर्श ठरू शकते, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

असे आहे नैसर्गिक शेतीचे सुरत मॉडेल
नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सुरतमधील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ७५ शेतकर्‍यांची निवड करण्यासाठी ग्राम समिती, तालुका समिती आणि जिल्हा समिती स्थापन करण्यात आली होती. या प्रशिक्षणादरम्यान कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. याचा फायदा असा झाला की, इतक्या कमी कालावधीत ५५० हून अधिक पंचायतींमधील ४० हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीशी जोडले गेले आहेत. या शेतकर्‍यांमुळे नैसर्गिक शेतीचे महत्त्व आता अन्य शेतकर्‍यांनाही कळू लागले आहे. सुरतमध्ये होत असलेल्या या प्रयोगामुळे गुजरातमधील अनेक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळतांना दिसत आहेत.

नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी विशेष मोहिम
बाजारात नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांना वेगळी मागणी असून त्याची किंमतही जास्त आहे. या योजनेअंतर्गत ३०,००० क्‍लस्टर तयार करण्यात आले आहेत. येत्या काळत देशातील सुमारे १० लाख हेक्टर क्षेत्रफळावरील क्षेत्र यात समाविष्ट केली जाईल. नैसर्गिक शेतीचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेऊन आम्ही ते नमामि गंगे प्रकल्पाशीही जोडले आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देशात गंगेच्या काठावर एक वेगळी मोहीम राबवली जात आहे, एक कॉरिडॉर बनवला जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

Exit mobile version