या पिकातून केवळ १३० दिवसात कमवा लाखों रुपयांचा नफा

ratal

लातूर : भारतातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकेच घेतात. पण आता हळूहळू शेतकरी नवीन प्रकारच्या फायदेशीर पिकांकडे वळू लागले आहेत. रताळे हे देखील असेच पीक आहे. रताळे हा बटाट्याच्या प्रजातीचा सदस्य आहे. एक हेक्टरमध्ये रताळ्याची लागवड केली तर सुमारे २५ टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. बाजारात १० रुपये किलोने विकले तरी मोठा नफा मिळू शकतो. रतळे लागवडीबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये रताळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तिन्ही हंगामात याची लागवड करता येते, परंतु पावसाळ्यात लागवड करणे सर्वात फायदेशीर आहे. या हंगामात रताळ्याची रोपे चांगली वाढतात. २५ ते ३४ अंश तापमान रोपांच्या वाढीसाठी उत्तम आहे. रताळ्यांची लागवड बियाण्यांपासून नव्हे, तर कंदांपासून म्हणजेच मुळांपासून केली जाते.

रताळे लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती माती सर्वात योग्य आहे. कठीण, खडकाळ जमिनींवर त्याची लागवड करणे अत्यंत हानिकारक ठरू शकते. लक्षात ठेवा की ज्या जमिनीवर रताळ्याची लागवड केली जात आहे त्या जमिनीचे पीएच मूल्य ५.८ ते ६.८ दरम्यान असावे. रताळ्याची रोपे तयार केलेल्या कलमांप्रमाणे रोपवाटिकेत लावली जातात. त्यासाठी एक महिना अगोदर रोपे तयार केली जातात. त्यासाठी रोपवाटिकेत बिया टाकून वेल तयार केला जातो. नंतर ते शेतात लावले जाते. त्याची रोपे लावल्यानंतर १२० ते १३० दिवसांत तयार होतात.

Exit mobile version