वातावरणात बदल; कांदा, हरभरा, मोहरीची अशी घ्या काळजी

नाशिक : गत १५ दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी कडाक्याची थंडी… याचा फटका रब्बी हंगामातील अनेक पिकांना बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे वातावरणातील बदलांच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांनी पीकांची योग्य पध्दतीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सध्या उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीचे काम जोमात सुरु आहे. मात्र, लागवड करताना शेतकर्‍यांना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. ६ आठवड्यांपेक्षा अधिकच्याच कालावधीचे रोपांची लागवड करणे गरजेचे आहे. लहान-लहान वाफे तयार करुन लागवड करावीव लागणार आहे जेणेकरुन पाण्याचे नियोजन करता येणार आहे. लागवडीच्या १०-१५ दिवस आधी शेतात २०-२५ टन सडलेले शेणखत घाला. रोप लागवड करताना काही वेळ पूर्वी २० किलो नायट्रोजन, ६०-७० किलो फॉस्फरस आणि ८०-१०० किलो पोटॅश लागवड क्षेत्रावर घालावे लागणार आहे. तर रोप अधिक खोलीवर लावयाचे नाही तर दोन वाफ्यांमध्ये १५ सेंमी अंतर आणि दोन रोपांमध्ये १० सेमी अंतर ठेवणे महत्वाचे आहे.

हरभरा पिकावर घाटीअळीचा धोका आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी एका एकरामध्ये ३ ते ४ टी आकाराचे सापळे लावणे महत्वाचे आहे. यामध्ये किड साठली जाऊन नंतर ती नष्ट करणे महत्वाचे आहे.

मोहरीवर चापा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे आढळून येताच शेतकर्‍यांनी पिकाच्या ज्या भागामध्ये लागण झाली आहे तो भाग काढून टाकणे महत्वाचे आहे. विशेषत: या किडीचा उद्रेक हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि मार्चपर्यंत टिकतो. ही किड वनस्पतींच्या खोडातून, फुलांपासून, पानांमधून आणि नवीन शेंगा पासून रस शोषून समूहाला कमकुवत बनवते.

Exit mobile version