कीटकनाशकांची फवारणी करताना अशी घ्या काळजी अन्यथा जीवावर बेतू शकते संकट

favarani Pesticides 1

नागपूर : शेतात किड, रोग किंवा तणांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. ही रासायनिक औषधे फवारताना रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. कीटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होवून शेतकर्‍यांना शारिरीक त्रास होण्याची शक्यता असते. योग्य ती काळजी न घेतल्यास मृत्यूचा धोका देखील असतो. यामुळे कीटकनाशकांची फवारणी करतांना योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता असते. आज आपण फवारणीवेळी कोणत्या प्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता असते तसेच यासंबंधी तज्ञांनी काय सल्ले दिले आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.

कीटकनाशकांची फवारणी करतांना अशी घ्या काळजी
१) फवारणी करतांना संरक्षक कपडे वापरावेत. यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, डोळ्यांवर गॉगल आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे.
२) फवारणी करताना पंपाचे नोझल शरीरापासून टूर धरावे. जेणेकरुन किटकनाशके अंगावर पडणार नाही. कारण, विषबाधा झालेल्या बहुतांशी शेतकर्‍यांमध्ये हिच तक्रार दिसून आली आहे.
३) फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये. यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.
४) पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर फवारणी करु नये.
५) वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये.
६) फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावं.
७) फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरु नये.
८) फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे.
९) किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करू नये.
१०) जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती/चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत.

फवारणीनंतर तात्काळ करावयाची कामे:
१) फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवुन ठेवावेत. तसेच कीटकनाशकांचा वापर संपल्यावर त्वरित स्नान करावे
२) राहिलेल्या ट्रावणाची सुरक्षित ठिकाणी (उदा. पडीक /निर्मनुष्य क्षेत्र) विल्हेवाट लावा. राहिलेले द्रावण पाण्याच्या स्रोतांमध्ये किंवा त्यांच्या जवळ फेकून देऊ नका.
३) वापरलेले/रिकामे डबे दगड/ काठीच्या सहाय्याने चेपा आणि त्यांना दूर निर्मनुष्य ठिकाणी, आजूबाजूला पाण्याचा स्त्रोत नसलेल्या ठिकाणी खोल मातीमध्ये पुरून टाका. वापरलेले/रिकामे डबे इतर वस्तू साठवण्यासाठी वापरात आणू नका.
४) विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागल्यास प्रथोमोपचार करा आणि रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांना रिकामे डबे देखील दाखवा.
५) किटकनाशकांची साठवण सुरक्षित ठिकाणी करावी, जेथे लहान मुलांचा हात पोहचणार नाही. अशा ठिकाणी कीटनाकशके ठेवावीत.

विषबाधाची लक्षणे
अशक्तपणा व चक्कर येणे.
त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे.
डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे.
तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे.
डोकेटुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जीभ लुळी पडणे, बेशुद्ध होणे, थाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.

विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार
किटकनाशके/ तणनाशके डोळ्यांत उडाल्यास, तत्काळ डोळे स्वच्छ पाण्याने ५ मिनिटापर्यंत पाण्याची धार सोडून धुवावे.
शरीरावर उडाले असल्यास १९० मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
विषबाधेनंतर रोगी जर संपूर्ण शुद्धीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही व ३ चमचे बारीक लाकडी कोळसा भूकटी करून अर्धा ग्लास पाण्यातून पाजा व लगेच दवाखान्यात न्या.
विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.
व्यक्तीला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी ठेवावी.
बेशुद्धावस्था असल्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.

Exit mobile version