पिकाची काढणी, कापणी करतांना अशी घ्या काळजी

harvesting-of-crops

नागपूर : खरिप हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने पिक काढणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरु आहे. पिकांची शास्त्रोक्त पध्दतीने काढणी, मळणी व साठवणूक केल्यास संभाव्य नुकसान टाळता येवू शकते. धान्याचा तसेच बियाण्याचा दर्जा टिकविण्यासाठी पिकाची कापणी शास्त्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक आहे. यामुळे अन्नधान्य पिकांची काढणी करतांना कोणत्या प्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता असते, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

दाणे भरून पक्व झाल्यापासून पिकाची कापणी करेपर्यंतची हवामानाची स्थिती ही फार महत्चाची असते. दाणे पक्व होत असताना आर्द्रता झपाट्याने कमी होत असते. या काळात अवकाळी पडणारा पाऊस अत्यंत नुकसानकारक असतो. ७ जर पक्व अवस्थेत पीक असताना पाऊस आला, तर पाऊस थांबल्यानंतर लगेच पिकाची कापणी करावी. पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे.

मोठ्या क्षेत्रावर पिकाची लागवड केलेली असल्यास वेळ व खर्चाची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी यंत्राद्वारे किंवा कापणी व मळणी यंत्राद्वारे करणे योग्य ठरते. कापणी करताना पाते जमिनीच्या वर ८ ते १९० सें.मी. राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील, याची काळजी घ्यावी. कापणी यंत्रांचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. काही ठिकाणी कापणी-मळणी यंत्रामुळे अपघात घडल्याची उदाहरणे आढळून येतात. यामुळे सुरक्षित पध्दतीने कापणी यंत्राचा वापर करावा.

Exit mobile version