शेतकर्‍यांचे नुकसान टाळणार टर्मिनल मार्केट; असे होतील फायदे

farmer

नाशिक : फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे ३०-४० टक्के काढणीपश्चात नुकसान होत आहे. नाशवंत फलोत्पादनाचे नुकसान कमी करुन त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी व मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी टर्मिनल मार्केटची संकल्पना पुढे आलेली आहे. टर्मिनल मार्केट हे देशातील मोठ्या शहरांजवळ निर्माण करुन असे मार्केटस फलोत्पादन होणार्‍या भागामधील संकलन केंद्राशी जोडण्याचे नियोजित केलेले आहे. अशा संकलन केंद्रांमुळे नाशवंत फलोत्पादन संकलीत करुन त्याठिकाणी क्‍लिनिंग करुन जास्तीत जास्त गार्बेज त्याच ठिकाणी काढून स्वच्छ केलेला माल टर्मिनल मार्केटमध्ये पाठविण्यात येणार आहे.

उत्पादित क्षेत्रातील संकलन केंद्र व टर्मिनल मार्केटस् ही रिफर व्हॅन्सने जोडली जाणार असल्यामुळे काढणीपश्चात नुकसान टाळणे शक्य होणार आहे. टर्मिनल मार्केटमध्ये आलेले फलोत्पादन प्रिकुलिंग व ग्रेडींग करुन कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक करण्याचे नियोजित आहे. टर्मिनल मार्केट मध्ये इलेक्ट्रॉनिक लिलावगृहाद्वारे मालाची विक्री होणार आहे. तसेच सदर मार्केटमधून देशांतर्गत विक्री व्यवस्था, फलोत्पादनाच्या प्रक्रियेची व्यवस्था अपेक्षित आहे.

टर्मिनल मार्केटमधून फलोत्पादन निर्यातीस पाठविणेही अपेक्षित आहे. यासाठी टर्मिनल मार्केटमध्ये प्रशितकरण, शितगॉह, रायपनिंग चेंबर, ग्रेडींग पॅकींग, गोडावून, प्रक्रिया केंद्र , बँक, पोस्ट ऑफिस, इलेक्ट्रॉनिक लिलावगृह इ. मूलभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. टर्मिनल मार्केटची उभारणी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या सहभागातून अपेक्षित आहे. टर्मिनल मार्केट हे हब व स्पोक संकल्पनेवर आधारित चालविण्यात येणार आहे. टर्मिनल मार्केटमध्ये ७० टक्के फळे व भाजीपाला, १५ टक्के अन्नधान्य व १५ टक्के पोल्ट्री, मांस, दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी अपेक्षित आहे.

टर्मिनल मार्केट संकल्पनेचा उद्देश
फलोत्पादनाच्या विक्रीचे प्रचलित पध्दतीमुळे होणारे नुकसान कमी करणे.
शेतकर्‍यांना थेट बाजारांशी संपर्क प्रस्थापित करुन उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करुन देणे व मध्यस्थांची साखळी कमी करणे.
फलोत्पादन पणन व्यवस्थेत आधुनिक साधनांचा उपयोग करणे व खाजगी गुंतवणूकदारांच्या सहाय्याने शीत साखळी निर्माण करणे.
फलोत्पादन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता आणणे.
फलोत्पादन निर्यातीस प्रोत्साहन
फलोत्पादन प्रक्रियेचे प्रमाण वाढविणे.
(महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संकेतस्थळावरुन साभार)

Exit mobile version