पीएम किसान योजनेच्या १२ व्या हप्तासाठी काय आहेत नियम-अटी

pm-kisan-yojana-marathi

नाशिक : पीएम किसान योजनेतील ११ वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकताच जमा झाला आहे. पण १२ हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकर्‍यांना ई-केवायसी करणे गरजेचे राहणार आहे. ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यासाठी आता ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मे ही डेडलाईन होती. आता ३१ जुलैपर्यंत ही वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे कीती शेतकरी याचा लाभ घेणे महत्वाचे आहे.

देशभरातील १० कोटी ५० लाख शेकतरी हे पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकजण पात्र नसतानाही या योजनाचा लाभ घेत असल्याचे मध्यंतरी उघडकिस आले होते. अपात्र लाभार्थ्यांकडून सर्व रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. भविष्यात असे प्रकार घडून नये तसेच या योजनेमध्ये नियमितता यावी, पात्र शेतकर्‍यास योग्य मोबदला मिळावा यासाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत शेतकर्‍यांनी ई केवायसी करणे बंधनकारक होते. असे असले तरी शेतकर्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे केंद्राच्या आवाहनानंतरही शेतकरी हे दुर्लक्ष करीत असतील तर ते योजनेपासून वंचित राहणार आहेत. ३१ जुलै ही अंतिम मुदत राहाणार आहे.

असे करा ई-केवायसी
सर्वप्रथम ‘ई-केवायसी’ साठी प्रथम योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला e-KYC दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी बटणवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर OTP पुन्हा येईल जो 6 अंकांचा असेल. ते भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

Exit mobile version