सोयाबीनपेक्षा कापूस व मक्याचे क्षेत्र वाढणार; वाचा सविस्तर

cotton maka

मुंबई : खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका, डाळींब या पिकांची लागवड करतात. या वेळी या भागातील एकूण खरीप पिकांच्या क्षेत्रात किरकोळ वाढ होऊ शकते असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यंदा सोयाबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र सोयोबीनपेक्षा कापूस व मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता अधिक आहे.

धान पीक हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पादन क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न मिळणार त्याच पिकांवर शेतकरी भर देणार आहेत. बाजारपेठीतील मागणी शेतीमालाचे दर हे पाहून शेतकरी पीक पध्दती ठरवित आहे. महाराष्ट्रात तब्बल ५१ लाख हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. सोयाबीनसाठी केवळ मध्य प्रदेशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातही पोषक वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होणार नाही. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये प्रति हेक्टर १२८९ किलोने सोयाबीनची वाढ झाली होती तर यंदा हीच वाढ १४६३ किलोने होणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत. मात्र ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते शेतकरी कापसावरच भर देत आहेत. शिवाय गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला होता. १४ हजार रुपये क्विंटल दर मिळाला असे असूनही कापसाला मागणी कायम आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे ७ हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक मिळाला नव्हता. दरातील या तफावतीमुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

Exit mobile version