शेतकर्‍यांनीच सावरली देशाची अर्थव्यवस्था… हा घ्या पुरावा

farmer economi

नवी दिल्ली : अपेडाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्यात केलेल्या कृषी उत्पादनांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात म्हटले आहे की २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय कृषी उत्पादनांची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढली आहे. एका वर्षापूर्वीच्या कालावधीपर्यंत ही निर्यात ११.०६ अब्ज होती, या वर्षी ती १३.७७ बिलियन (सुमारे १,०७,९४२ कोटी) झाली आहे. यावरुन लक्षात येते की, कोरोना, लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय अस्थितरता अशा एकामागून एक आलेल्या संकटांमध्ये शेतकर्‍यांनीच देशाची अर्थव्यवस्था सावरली हे स्पष्ट होते.

देशांतर्गत बाजारात भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत गव्हाच्या निर्यातीत विक्रमी १३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गव्हाची निर्यात ०.६३ अब्ज होती, या वर्षी १.४९ अब्ज (सुमारे १२२८८ कोटी) ची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मक्यासह इतर धान्यांच्या (तांदूळ, गहू वगळता) निर्यातीत १२ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ते ४६७ दशलक्ष होते, ते चालू आर्थिक वर्षात ५२५ दशलक्ष (सुमारे ४३,३११ कोटी) झाले आहे.

Exit mobile version