होमिओपॅथिक शेती, वाचा कुठे झाला महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग

Homeopathic farming

पुणे : केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आतापर्यंत रासायनिक, जैविक, सेंद्रिय, एकात्मिक शेतीचे अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र होमिओपॅथिक शेतीबद्दल कुणी ऐकले आहे का? होमिओपॅथिक औषधांचा वापर मानवाच्या उपचारासाठी केला जातो मात्र याच होमिओपॅथिक औषधांचा वापर करुन मिरचीचे यशस्वी उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच बारामतीत नेदरलँडच्या स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची आणि ढोबळी मिरची होमिओपॅथि औषधावर यशस्वीरित्या उत्पादित करण्यात आली आहे. कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र पाटील यांच्या संशोधित होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचं पीक घेण्यात आलं आहे. मिरचीवर फवारणीसाठी आणि तिच्या वाढीसाठी संपुर्ण होमिओपॅथिची औषध फवारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत ३ पट कमी आहे.

होमिओपथी औषधावर आधारीत तंत्रज्ञानाद्वारे केवळ वीस हजार रुपयात एका एकर मिरचीचे उत्पादन यशस्वीरित्या घेता येऊ शकते ते येथे दाखवून देण्यात आले आहे. तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आलाय. ज्याचा खर्च शेडनेट किंवा पॉलिहाऊस पेक्षा खूप कमी आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version